पोटच्या मुलाचा जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न

शेगांव – बुलडाण्यातील शेगांवात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 22 वर्षीय मुलाने जन्मदात्या आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रसंग केला आहे. या घटनेनंतर पीडित आईने मुलाविरुद्ध शहर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
पीडितेत्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा हा पीडित महिलेच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे. तसेच त्याला दारूचे सुद्धा व्यसन आहे.
30 सप्टेंबर रोजी आरोपी मुलगा दारू पिऊन फिर्यादीच्या घरी आला होता. यावेळी तो आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. मात्र आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने आईला शिवीगाळ केली. मुलाच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला आपल्या मुलीला घेऊन दुसरीकडे झोपायला गेली.
त्यानंतर आरोपी पीडितेच्या घरातून निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आरोपी तरुण पुन्हा पीडितेच्या घरी आला. यावेळी आरोपीने आपल्या जन्मदात्या आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नराधमाने आईला रबरी पाईपने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.





