भारतातील सर्वात श्रीमंत ‘बाबा’, ‘गुरूंची’ संपत्ती जाणून व्हाल थक्क…!

अनेक धार्मिक बाबा-बुवा प्रवचनांसाठी लाखो रुपये घेतात, अलिशान गाड्यांमधून, हेलिकॉप्टरमधून फिरतात. त्यांची जीवनशैली अलिशान असते. अशाच काही श्रीमंत व्यक्तींविषयी…
स्वामी नित्यानंद – स्वामी नित्यानंदने नित्यानंद ध्यान पीठम फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. हे फाउंडेशन जगभर मंदिरे, गुरुकुल, आश्रम यांच्यासाठी काम करते आणि या नित्यानंद महाराजाची संपत्ती सुमारे दहा हजार कोटी रुपये एवढी आहे.
पॉल दिनकरन बाबा – भारतीय ख्रिस्ती लोकांमध्ये परिचित असलेल्या पॉल दिनकर हा कारुण्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेसचा कुलपती म्हणून वावरतो आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे 45 कोटी रुपये एवढी आहे.
आचार्य बालकृष्ण – रामदेव बाबा यांचे सहकारी अशी आचार्य बालकृष्णची ओळख आहे आणि पतंजली आयुर्वेद कंपनीचे 97 टक्के हिस्सेदारी आचार्य बालकृष्ण याच्याकडे असल्याचे सांगण्यात येते. या सगळ्या समभागांचे एकूण मूल्य सुमारे १.६ लाख कोटी रुपये आहे.
गुरमीत राम रहीम सिंग इन्सान -1990 पासून गुरमीत राम रहीम याची संस्था कार्यरत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत अध्यात्मिक गुरु अशी गुरमीत राम रहीम यांची ओळख आहे. त्याच्या संपत्तीचे एकूण मूल्य 1455 कोटी रुपये आहे.
सद्गुरु जग्गी वासुदेव – इशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे योग विषयक कार्यक्रम जगभर चालू असतात. त्याखेरीज ते पर्यावरणासंदर्भात आणि मातीचे संवर्धन करण्याबाबत सक्रिय असतात. भारत सरकारने त्यांचा पद्मविभूषण किताब देऊन गौरव केलेला आहे. त्यांच्या संपत्तीचे मूल्य सुमारे 18 कोटी रुपये एवढे आहे.
माता अमृतानंदमयी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 रोजी झाला आहे. त्यांना अम्मा या नावाने ओळखले जाते. त्या अमृतानंदमयी ट्रस्टच्या प्रमुख आहेत. या ट्रस्ट कडे सुमारे 1500 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
श्री श्री रविशंकर – आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशनचे संस्थापक असणाऱ्या श्री श्री रविशंकर यांच्या कार्यासाठी जगभरातून लक्षावधी देणगीदार देणग्या देत असतात. आर्ट ऑफ लिविंग सेंटर आरोग्य सेवा सुविधा औषध निर्माण अशा सर्व क्षेत्रातील त्यांची संपत्ती सुमारे 1000 कोटी रुपये एवढी आहे.
बाबा रामदेव बाबा – रामदेव हे पतंजली आयुर्वेद लिमिटेड चे सहसंस्थापक आहेत. त्याखेरीज जगभर योगाचा प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आयुर्वेद, व्यवसाय, राजकारण, शेती अशा अनेक क्षेत्रात ते सक्रिय असतात. 1995 मध्ये त्यांनी दिव्य योग मंदिर ट्रस्टची स्थापना केली. 2022 च्या वृत्तानुसार त्यांच्या संपत्तीचे निव्वळ मूल्य 1600 कोटी रुपये होते.
आसाराम बापू – आसाराम बापू यांचे जगभर 350 आश्रम आणि 17000 बाल संस्कार केंद्र आहेत. 2021 च्या माहितीनुसार त्यांचा ट्रस्टची वार्षिक उलाढाल ही सुमारे 350 कोटी रुपये एवढी होती.














