Ranbir Kapoor : ‘तू खूप जास्त बोलतोस…’; रणबीर पापाराझीवर चांगलाच भडकला! व्हिडिओ व्हायरल
Ranbir Kapoor : नुकतीच मुंबईतील एका हॅाटेलमध्ये ‘लव्ह अँड वॉर’ची टीम एकत्र आली होती. यावेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी रामायण चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांना उत्सुकता असतानाच रणबीरच्या आणखी एका बहुप्रतिक्षित चित्रपटाचीही चर्चा रंगली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
नुकतीच मुंबईतील एका हॅाटेलमध्ये ‘लव्ह अँड वॉर’ची टीम एकत्र आली होती. यावेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल आणि संजय लीला भन्साळी एकत्र दिसत आहेत. यावेळी चौघांनी कॅमेऱ्यासमोर पोझ देत एकत्र फोटोही काढले. मात्र, त्यानंतर एका पापाराझीच्या सततच्या आग्रहामुळे रणबीर नाराज झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पापाराझी रणबीरला इतर कलाकारांसोबत पोज देण्यासाठी वारंवार सांगत होता. यानंतर रणबीर चांगलाच भडला आणि “तु खूप जास्त बोलत आहात.” अशा शब्दांत पापाराझीला सुनावले. त्यानंतर रणबीरने गर्दीतून आलियाला मार्ग करून देत तिला कारपर्यंत पोहोचवल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली असून, २१ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या चित्रपटाची कथा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित आहे. रणबीर, आलिया आणि विकी यांचे वेगवेगळे लूक समोर आल्यानंतर चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकाच चित्रपटात एकत्र येत स्क्रिन शेअर करत असल्याने ‘लव्ह अँड वॉर’कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





