” ***च्यांनो तुम्ही राणे आणि जगतापपर्यंत…”; ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली

Gopichand Padalkar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊनही आमदार गोपीचंद पडळकर हे वादग्रस्त करत आहेत. गुरुवारी अहिल्यानगरमध्ये एमआयएमची भव्य सभा पार पडली. या सभेतून पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, माजी खासदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी आक्रमक पद्धतीने भाषणे केले. भाषणात या नेत्यांनी मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
या टीकेचा समाचार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कालच पार पडलेल्या आक्रोश सभेतून घेतला. पण टीकेला प्रत्युत्तर देताना पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरली. ***च्यांनो तुम्ही राणे आणि जगतापपर्यंत जाण्याआधी थडग्यात जाल, त्यावर आमच्याकडून भगवा आणि निळा झेंडा रोवला जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
अहिल्यानगरमध्ये झालेल्या सभेत हिंदुत्त्वाचा कडवा पुरस्कार करणाऱ्या मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना डिवचण्यात आले होते. वारीस पठाण यांनी तर नितेश राणे यांना थेट आव्हान देत येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हटले होते. तर जलील यांनी नितेश राणेंचा ‘छोटासा चिंटू’तर संग्राम जगताप यांचा चिकनी चमेली उल्लेख केला होता.
पडळकर यांनी आपल्या भाषणात आमदार संग्राम जगताप हे जिहादींचे बाप असल्याचे म्हणत एमआयएमच्या नेत्यांना फटकारले. तसेच दुसऱ्या देशामध्ये असे चालते का?, भडव्यांनो भारतातील महामानवांविषयी चुकीचे वक्तव्य कराल तर आमचे तरुण ठोकून काढतील, असा थेट इशारा देत ठोकून काढण्याची भाषा त्यांनी केली.
नेमकं काय म्हणाले पडळकर?





