‘तुम्ही मास्क वापरू नका; कोरोना महामारी हा आंतरराष्ट्रीय कट’ म्हणणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Updated On:
‘तुम्ही मास्क वापरू नका; कोरोना महामारी हा आंतरराष्ट्रीय कट’ म्हणणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली – मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि अत्यंत आवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडणे असे सरकारकडून करोनाची पहिली लाट आल्यापासूनन सांगितले जात होते. मात्र सरकाने दिलेल्या या सूचनांवर एका दिल्लीमधील डॉक्टरने सोशलवर चुकीचा संदेश देणारा व्हिडियो शेअर करत सर्व सामान्यांची दिशा भूल केली आहे.

या व्हिडियोमध्ये दिल्लीतील डॉक्टर एमडी रेडिओलॉजिस्ट डॉ. तरुण कोठारी यांनी लोकांना  मास्क न वापरण्याचं आवाहन केलं. यामध्ये ते म्हणाले होते, “सरकार जरी मास्क वापरण्यास सांगत असतील  तरी सुद्धा तुम्ही आजिबात मास्क वापरू नका. कोरोना महामारी हा आंतरराष्ट्रीय कट आहे .

तुम्ही  मास्क वापरल्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवेल. मास्क वापरल्यास श्वसनासंबंधी आजार होतील. आणि या आजारासाठी तुम्ही जर रुग्णालयात गेला तर तुमच्यावर चुकीचे उपचार केले जातील आणि तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमची गणना कोरोना बळीत होईल. त्यामुळे मास्क वापरणं सोडा, आणि या व्हिडिओला देशभरात व्हायरल करा.”  असं त्यांनी या व्हिडियोत म्हणत मास्क न वापरण्याचे आवाहन केलं आहे.

दरम्यान, हा व्हिडियो व्हायरल होताच  दिल्लीतील सायबर सेलने कोठारींविरुद्ध जामीनपात्र गुन्हे दाखल करुन तपास सुरू केला आहे. कोठारी यांच्यावर कलम 117 म्हणजे दहापेक्षा अधिक लोकांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे, कलम 188 म्हणजे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, आणि कलम 269 म्हणजे जाणूनबुजून एखाद्याचे आयुष्य धोक्यात आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Riteish Deshmukh : "वडील मुख्यमंत्री असल्याने सिनेमात काम मिळतंय"; रितेशने सांगितल्या कटू आठवणी

2026-07-06 13:42:35

Riteish Deshmukh : "वडील मुख्यमंत्री असल्याने सिनेमात काम मिळतंय"; रितेशने सांगितल्या कटू आठवणी

Neha Dhupia : "हे सगळं बंद करा," नेहा धुपिया पापाराझींवर भडकली

2026-07-02 11:13:35

Neha Dhupia : "हे सगळं बंद करा," नेहा धुपिया पापाराझींवर भडकली

Raghav Juyal : राघव जुएलने दिली प्रेमाची कबुली? शेअर केले फोटो

2026-06-30 10:27:22

Raghav Juyal : राघव जुएलने दिली प्रेमाची कबुली? शेअर केले फोटो

Samay Raina : कॉमेडियन समय रैना 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला करतोय डेट?

2026-06-29 13:39:35

Samay Raina : कॉमेडियन समय रैना 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला करतोय डेट?

Sunita Ahuja : सुनीता आहुजाची ‘लॉक अप २’मध्ये एन्ट्री; म्हणाली "गोविंदा खूप टेन्शनमध्ये..."

2026-06-28 14:58:12

Sunita Ahuja : सुनीता आहुजाची ‘लॉक अप २’मध्ये एन्ट्री; म्हणाली "गोविंदा खूप टेन्शनमध्ये..."