बाहेर देशात फिरायला जायचंय? व्हिसा नाही? भारतीय व्हिसाशिवाय ‘या’ 5 देशांमध्ये प्रवेश करू शकतात

Travel abroad without a visa| तुम्हीही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसह परदेशात जाण्याचा विचार करत आहात आणि तुमच्याकडे व्हिसा नसेल तर भारतीयांना व्हिसाशिवाय देखील काही देशात प्रवेश मिळतो. तुम्ही या देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकता.
मॉरिशस-
तुम्ही कुटुंबियांसोबत मॉरिशसला जाऊ शकता. मॉरिशस हे बेटे, आलिशान रिसॉर्ट्स आणि समुद्रकिनारे यासाठी ओळखले जाते. येथील पाणी अतिशय स्वच्छ आहे. यामध्ये तुम्ही स्नॉर्कलिंगचा आनंद घेऊ शकता. येथे हिरवीगार जंगले आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. मॉरिशस 90 दिवसांपर्यंत व्हिसा-मुक्त राहण्याची परवानगी देते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
इंडोनेशिया-
इंडोनेशिया येथील पुरातन मंदिरे प्रसिद्ध आहेत. इंडोनेशिया आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील सूर्यास्ताची एक वेगळीच मजा आहे कारण हे दृश्य पाहण्यासारखे आहे. इंडोनेशियन संस्कृतीतील काही गोष्टी भारतीय संस्कृतीशी जुळतात.
थायलंड –
भारतीय पर्यटकांची पहिली पसंती थायलंडला असते. नाईट लाइफ, खरेदी बाजार, समुद्रकिनारा आणि प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. थायलंड 10 मे 2024 पर्यंत 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देत आहे.
मलेशिया-
मलेशिया आपल्या संस्कृती, समुद्रकिनारे आणि खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथील ट्विन टॉवर्स आणि क्वालालंपूर शहर खूप प्रसिद्ध आहेत. हा देशही तुमच्या बजेटमध्ये सहज समाविष्ट होईल.
इराण-
इराण 15 दिवसांचा मोफत व्हिसा देत आहे. ( Travel abroad without a visa )





