“पुन्हा एकदा या भूमीवर तुमचं खूप स्वागत”; आर. माधवनकडून सुनीता विल्यम्स यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

R. Madhavan Post | संपूर्ण जगासाठी आज आनंदाचा क्षण आहे. नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. दोन्ही अंतराळवीर आज भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. १७ तासांच्या प्रवासानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. दरम्यान, त्यांच्या पृथ्वीवर आगमनाने जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुनीता यांच्याविषयी अभिनेता आर.माधवनने देखील आनंद व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.
आर.माधवनची पोस्ट
“प्रिय सुनीता विल्यम्स, पुन्हा एकदा या भूमीवर तुमचं खूप स्वागत आहे. आमच्या प्रार्थनांना आज यश आलं. तुम्हाला सुरक्षित आणि हसताना पाहून खूप छान वाटतंय. तब्बल २६० हून जास्त दिवस अंतराळात राहून सुरक्षित परत येणं. करोडो लोकांच्या सदिच्छा आणि देवाच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालं आहे. तुमच्या संपूर्ण टीम आणि क्रूला माझ्याकडून अभिनंदन.” असे पोस्टमध्ये आर.माधवनने सुनीता विल्यम्स यांच्याविषयी लिहिली आहे. R. Madhavan Post |
View this post on Instagram
सुनीता विल्यम्स यांची दमदार कामगिरी
दरम्यान, सुनीता आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे ९ महिने राहिले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून २०२४ रोजी आयएसएसवर पोहोचले. त्यांची भेट फक्त ८ दिवसांची होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तिथे ९ महिने राहावे लागले. मात्र, या मोहिमेदरम्यान, सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिल्या.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की, या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉल मैदानाइतके आहे. त्यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले. R. Madhavan Post |
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने, सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील २८६ दिवसांत ९०० तासांचे संशोधन पूर्ण केले. या काळात त्यांनी सुमारे १५० प्रयोग केले. सुनीता विल्यम्स ही अंतराळात इतका वेळ घालवणारी जगातील पहिली महिला ठरली आहे. नासाने असेही म्हटले आहे की, सुनीता यांनी अंतराळ स्थानकाच्या बाहेर ६२ तास ९ मिनिटे घालवली, म्हणजेच त्यांनी ९ वेळा अंतराळात वॉक केला. मोठ्या कामगिरीनंतर त्यांचे पुन्हा पृथ्वीवर आगमन झाले आहे.
हेही वाचा :





