“तुम्ही प्रत्येकाच्या विचारात असता..”; पत्नी अनुष्काची पोस्ट विचार करायला लावणारी, विराट BCCI वर पुन्हा संतापला…

Anushka Sharma Virat Kohli | विरअनुष्काची जोडी सिनेमा आणि खेळ याचे अद्भुत मिश्रण असणारी जोडी समजली जाते. भारतीय संघातील किंग कोहली अशी उपाधी आपल्या नावे केलेल्या विराट कोहली मैदानात आपली सर्वात्तम खेळी करत असतो. मात्र, कधी कधी अपयश आल्यानंतर ती गोष्ट विराटला पचवण्यासाठी काही वेळ जातो. बऱ्याचदा त्याच्या जिव्हारी ही गोष्ट लागते. हाच विराट सध्या मात्र त्याचं कौतुक करणाऱ्या बीसीसीआय (BCCI) अर्थात भारतीय क्रिकेय नियामक मंडळावर संतापल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे सर्वत्र अनेक प्रकाराच्या चर्चा झडू लागल्या आहेत. अशातच त्याची पत्नी अनुष्काने इंन्टाग्रावर स्टोरीवर केलेल्या सूचक पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने स्टोरीमध्ये लिहिलेला शब्द नेटकऱ्यांना विचार करायला भाग पाडत आहे.
अनुष्काची पोस्ट
लुईजी पिरांडेलो यांनी 1926 मध्ये ‘वन, नो वन अँड वन हंड्रेड थाऊजंड’ या पुस्तकातील एक कोट अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या मजुकराचा मराठीत अर्थ पुढीलप्रमाणे, तुम्हाला ओळखणाऱ्या प्रत्येकाच्याच डोक्यात तुमची एक वेगळी प्रतिमा असते. तुम्हाला जे ‘आपलेपण’ वाटतंय ते फक्त तुमच्यासाठीच आहे किंबहुना तुम्हालाही ते कोण हे ठाऊक नाही. तुम्ही ज्या कोणाला भेटता, नजरेला नजर देता किंवा वाटेनं चालताना लक्षपूर्वक पाहता त्यांच्या डोक्यात तुमची प्रतिमा तयार होते.
तुम्ही तुमच्या आईसाठी, वडिलांसाठी, भावंडांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी, शेजाऱ्यांसाठी आणि मित्रांसाठी एकच व्यक्ती नसता. आजुबाजूला तुमचीच हजारो रुपं आहेत, जी लोकांच्या डोक्यात, विचारात आहेत. तुम्ही प्रत्येकाच्या विचारात असता आणि तुम्ही…. तुमचं आपलेपण तरीही कोणीच नसतं…’ अशी सूचक आणि भावनिक पोस्ट तिने शेअर केली आहे.
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण प्राप्त झाले आहे. बीसीसीआयने खेळाडूंवर त्यांच्या कुटुंबासंदर्भात घालून दिलेल्या नियमांचा विराटने बंगळुरू इथं एका मुलाखतीदरम्यान निषेध केला होता. तणावाच्या स्थितीमध्ये कुटुंब तिथे असणे किती गरजेचे असते ही बाब विराटने एका मुलाखती दरम्यान मांडली होती. तूर्तास विराटच्या या भूमिकेवर अद्यापही बीसीसीआयचे उत्तर मात्र प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे.





