Sandeep Deshpande post : नुकताच भारतीय जनता पार्टीचा मुंबईत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातून भाजपने आगामी होऊ घातलेल्या निवडणुकींचे रणशिंग फुंकले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होईल, असं विधान केलं. तसेच ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. या शिवाय भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी देखील ठाकरे बंधूंवर टीकचे झोड उठवली होती. आता राज ठाकरेंच्या मनसेच्या शिलेदारांने या टीकेला जोख प्रत्युत्तर दिलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आगामी निवडणुकीत राजकीय युती करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्या दृष्टीने संकेतही मिळू लागली आहेत. विरोधकांकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लक्ष्य केलं जात आहे. बेस्ट निवडणुकीत आमच्या शशांक राव आणि लाड, दरेकरांनी त्या ब्रँडचा बँड वाजवला. बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुंबईतील संकल्प मेळाव्यातून लगावला होता. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार ,खानाची भीती दाखवून भैय्या आणि गुज्जु महापौर करण्याचा कट उधळून लावणार.पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2025 या सगळ्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटप यांनी देखील ठाकरे बंधूंना डिवचलं. ठाकरे बंधूंच्या मुंबई महापालिका हातात सत्ता गेली, तर मुंबईतील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल. प्रत्येक दारावर बांगलादेशी असेल किंवा कुणीतरी खान मुंबईचा महापौर होईल, असा निशाणा साधला होता. तसेच हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता भाजपात आहे, असंही साटम म्हणाले होते. दिला थेट इशारा आता फडणीस आणि साटम यांनी केलेल्या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय संदीप देशपांडेंनी खडेबोल सुनावले आहेत. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. खानाची भीती दाखवून भैय्या आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार. पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार, असा थेट इशाराच संदीप देशपांडेंनी एक्स पोस्टवरून दिला आहे. हेही वाचा : अमेरिकन फेडच्या व्याजदर कपातीमुळे बाजार तेजीत ; सेन्सेक्स ८३,००० च्या पुढे