तूच माझा “व्हॅलेन्टाईन” ; अमेरिकेच्या पहिल्या लेडीचं अनोखं सेलिब्रेशन ;व्हाईट हाऊसमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Updated On:

न्यूयॉर्क : जगात काल प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यात आला. देश विदेशात हा प्रेमाचा सण सर्वानी आनंदाने साजरा केला. या सर्वांमध्ये सर्वात आकर्षणाचे सेलिब्रेशन ठरले ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडन यांचे. अमेरिकेचे नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा व्हाईट हाऊस मधील पहिला व्हॅलेन्टाईन डे त्यांच्या पत्नी जिल बायडन यांनी त्यांच्यासाठी खास केला.

अमेरिकेच्या पहिल्या लेडी जिल यांनी व्हाईट हाऊस मध्ये आपला व्हॅलेंटाईन डे खास पद्धतीने साजरा करणार होत्या. त्यासाठी त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये लॉनवर गुलाबी, पांढर्‍या आणि लाल रंगाच्या छटा दाखवल्या. “प्रेम”, “उपचार”, “ऐक्य” असा मजकूर असलेले लव्ह हर्ट जागोजागी लावण्यात आले होते. दरम्यान, हे असे सेलिब्रेशन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेच्या जनतेसाठी एक आश्चर्याचा धक्काच मानला गेला.

दरम्यान, जिल यांनी, अमेरिकेतील कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व जण जरा निराश झाले आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या या कृतीमुळे जरा आनंद, थोडी आशा मिळावी, एवढाच माझा उद्देश असल्याचे म्हटले. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी “व्हॅलेंटाईन डे हा एक मोठा दिवस आहे, जिलचा आवडता दिवस, असल्याचे सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Nigeria plane crash : नायजेरियात लष्करी विमान कसे कोसळले? 32 जणांचा मृत्यू

2026-10-06 22:27:12

Nigeria plane crash : नायजेरियात लष्करी विमान कसे कोसळले? 32 जणांचा मृत्यू

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

2026-10-05 21:57:39

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्‍ला; एकाचा मृत्‍यू, सहा जण जखमी

2026-10-04 19:25:58

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्‍ला; एकाचा मृत्‍यू, सहा जण जखमी

Nepal Floods : नेपाळ हिमस्खलनातील आणखी दोन मृतदेह सापडले; अजूनही किमान १२ गिर्यारोहक बेपत्ता

2026-09-28 19:39:19

Nepal Floods : नेपाळ हिमस्खलनातील आणखी दोन मृतदेह सापडले; अजूनही किमान १२ गिर्यारोहक बेपत्ता