“करोनाबाधिताच्या संपर्कात येऊनही योगींचा सभांमध्ये सहभाग”

प्रियांका गांधी यांचा दावा

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बेजबाबदारपणे वागत आहेत. करोनाबाधिताच्या संपर्कात येऊनही ते सभांमध्ये सहभागी होत आहेत, असा दावा कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरूवारी केला.

प्रियांका यांनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीचा आधार घेऊन योगी आणि त्यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडले. उत्तरप्रदेशच्या जनतेत घबराटीचे वातावरण आहे. रूग्णालये आणि स्मशानभूमी उपलब्ध होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. करोना मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय चुकीची आकडेवारी देत आहे. 

ज्यांनी जबाबदारीने आणि पारदर्शकपणे कार्य करायला हवे; तेच बेजबाबदारपणे वागत आहेत. जनतेने विश्‍वास ठेवावा यासाठी संकटकाळात नेत्यांनी सत्यतेच्या आणि योग्य वर्तणुकीचे उदाहरण घालून द्यायला हवे, असे प्रियांका यांनी ट्‌विटरवरून म्हटले. 

योगी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जात असलेल्या किंवा गेलेल्या राज्यांमध्ये अनेक प्रचार सभा घेतल्या. त्याचा संदर्भ प्रियांका यांनी दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.