Yogi meet Mohan Bhagwat । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. दोघांची ही भेट गोरखपूरमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या खराब कामगिरीनंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. कारण लोकसभा निवडणूक आणि राज्यात संघाचा विस्तार यापासून इतर मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 280 स्वयंसेवक कार्यकर्त्यांशी चर्चा Yogi meet Mohan Bhagwat । भागवत यांनी चिउताहा भागातील एसव्हीएम पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या संघ कार्यकर्ता विकास वर्ग शिबिरात स्वयंसेवकांना संबोधित केले, जेथे प्रशिक्षण शिबिर 3 जूनपासून आयोजित केले जात आहे. या प्रशिक्षण शिबिरात सुमारे 280 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. गुरुवारी, संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काशी, गोरखपूर, कानपूर आणि अवध प्रदेशात संघाची जबाबदारी सांभाळत असलेल्या संघाच्या सुमारे 280 स्वयंसेवक कार्यकर्त्यांशी संघाचा विस्तार, राजकीय परिस्थिती आणि सामाजिक चिंता यावर चर्चा केली. शाखांची संख्या, संघटनेचा विस्तार करण्यावर भर Yogi meet Mohan Bhagwat । मिळालेल्या माहितीनुसार, संघप्रमुखांनी शाखांची संख्या आणि संघटनेचा विस्तार करण्यावर भर दिला असून, संघातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा विस्तार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्यानंतर आरएसएस नेत्यांकडून सातत्याने वक्तव्ये येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर मोठे विधान करताना सत्ताधारी भाजपला ‘अहंकारी’ आणि विरोधी इंडिया ब्लॉकला ‘रामविरोधी’ म्हटले आहे.इंद्रेश कुमार म्हणाले, राम सर्वांना न्याय देतो. 2024 च्या लोकसभा निवडणुका बघा. ज्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू त्यांच्यात अहंकार निर्माण झाला. त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवला. पण त्याला जे पूर्ण अधिकार मिळायला हवे होते, जे अधिकार मिळायला हवे होते ते देवाने त्याच्या अहंकारामुळे बंद केले. हेही वाचा आरएसएसने अचानक भाजपवर टीका का केली ? ‘या’ नेत्याने सांगितले, ‘कारण’…