काँग्रेसच्या घोषणापत्रावर योगी आदित्यनाथ यांची टीका

लखनऊ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाकडून आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

या जाहीर नाम्यावर प्रतिक्रिया देताना योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, यावेळी देखील जनताच  काँग्रेसच्या नेतृत्वाला आणि सहयोगी दलांना उत्तर देईल आणि काँग्रेसचे सगळे खोटे दावे पुन्हा उघडे पडतील असे म्हंटले आहे. तसेच काँग्रेसवर घणाघाती आरोप करत, काँग्रेस पक्षाने ५५ वर्षाचे आपले अपयश हे, आपल्या ५५ पानांच्या घोषणा पत्रात व्यक्त केले असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.