लखनौ – योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत. शुक्रवारी लखनौमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, भाजप शासित राज्यांचे बहुतांश मुख्यमंत्री आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांच्यानंतर केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
याशिवाय भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात एकूण 52 मंत्री शपथ घेणार आहेत. लखनौच्या एकना स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला, ज्यामध्ये त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यादीनुसार राज्यात दोन उपमुख्यमंत्री, 16 मंत्री, 20 राज्यमंत्री, 20 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पाच महिला मंत्री आहेत.
Yogi Adityanath takes oath as Uttar Pradesh CM for second consecutive term
Read @ANI Story | https://t.co/hv5e4fBFmx#YogiAdityanath #YogiAdityanathOathCeremony #UttarPradesh pic.twitter.com/7F2t25o1Ge
— ANI Digital (@ani_digital) March 25, 2022
विशेष म्हणजे भाजपने यावेळी उपमुख्यमंत्रीपदासाठी दिनेश शर्मा यांना डावलले आहे. त्यांना सोडून भाजपने ब्राह्मण चेहरा म्हणून ब्रिजेश पाठक यांना दुसरे उपमुख्यमंत्री केले आहे. त्याचबरोबर अनिल राजभर, सूर्य प्रताप शाही, जयवीर सिंग, आशिष पटेल, संजय निषाद, जितिन प्रसाद, असीम अरुण आणि दयाशंकर सिंह हे मंत्री आहेत.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांची गुरुवारी भाजपच्या नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. निरीक्षक म्हणून आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत योगी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला 255 जागा मिळाल्या, तर त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलालला 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या.
37 वर्षांपूर्वी, 1985 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण दत्त तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुन्हा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले होते. तिवारी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल 37 वर्षांनंतर योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा हा विक्रम नोंदवला आहे.