लखनौ – योगी आदित्यनाथ यांनी आज दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 53 दिग्गज आहेत.
उपमुख्यमंत्री- केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक
कॅबिनेट मंत्री- सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी राणी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंग, धरमपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता नंदी, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल, संजय निषाद.
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) – नितीन अग्रवाल, कपिल देव अग्रवाल, रवींद्र जैस्वाल, संदीप सिंग, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धरमवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठोड, दयाशंकर सिंग, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना , दयाशंकर मिश्र दयालू.
राज्यमंत्री – मयंकेश्वर सिंह, दिनेश खाटिक, संजीव गौर, बलदेव सिंग ओलख, अजित पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, ब्रिजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठौर, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आझाद अन्सारी, विजय लक्ष्मी गौतम.
उत्तर प्रदेशच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ हे पाच वर्षांच्या सत्तेनंतर पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. हा राजकीय करिष्मा योगी आदित्यनाथ यांच्या नावाने नोंदवला गेला आहे. एवढेच नाही तर तब्बल 37 वर्षांनंतर सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे.
योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, भाजप शासित राज्यांचे बहुतांश मुख्यमंत्री आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.