“उत्तर प्रदेशात माफिया राज वर्चस्व गाजवू शकत नाही कारण…” ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान

Yogi Adityanath। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे याविषयी नुकतीच माहिती दिली. त्यांनी याविषयी बोलताना, “आठ वर्षांपूर्वीपर्यंत कोणीही कल्पनाही करू शकत नव्हते की उत्तर प्रदेश दंगलमुक्त आणि माफियामुक्त होईल, परंतु आज दंगलमुक्त आणि माफियामुक्त उत्तर प्रदेश हे वास्तव आहे.” असे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यानी,” आता माफिया प्रवृत्ती उत्तर प्रदेशात वर्चस्व गाजवू शकत नाही कारण ती उखडली गेली आहे.” असेही म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी,”आता गुंड बहिणी, मुली आणि व्यावसायिकांसाठी धोका बनू शकत नाहीत.” असेही सांगितले. गोरखपूरमधील दोन ‘कल्याण मंडपम’ (मानबेला आणि राप्तीनगर विस्तार योजना) चे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ मनबेला येथे उपस्थित असलेल्या गर्दीला संबोधित करत होते.
दोन्ही कल्याण मंडपम गोरखपूर विकास प्राधिकरणाने (जीडीए) अनुक्रमे २ कोटी ६५ लाख आणि ८५ लाख रुपये खर्चून बांधले आहेत. एका निवेदनानुसार, मुख्यमंत्र्यांनी मनबेला येथे बांधलेल्या कल्याण मंडपमसाठी त्यांच्या आमदार निधीतून पैसे दिले आहेत.
२०१७ पासून लोकांनी चांगले सरकार निवडले Yogi Adityanath।
कल्याण मंडपमच्या उद्घाटन समारंभात योगी यांनी, “उत्तर प्रदेशात सकारात्मक बदल आला आहे कारण २०१७ पासून लोकांनी चांगले सरकार निवडले आहे आणि चांगले सरकार चांगले करण्याचा विचार करते.”असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोणीही गुंतवणूक, चार पदरी कनेक्टिव्हिटी, बंद खत कारखाने पुन्हा सुरू करणे, नवीन उद्योग उभारणे याबद्दल विचारही करू शकत नाही, परंतु आज देशातील सर्वाधिक गुंतवणूक उत्तर प्रदेशात होत आहे आणि मोठे उद्योग उभारले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी कल्याण मंडपमचे उद्घाटन केलेल्या मनबेला या भागात २०१७ पर्यंत ‘एन्सेफलायटीस’चा प्रादुर्भाव असल्याचे मानले जात होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आठ वर्षांपूर्वी या हंगामात या आजारामुळे (एन्सेफलायटीस) अनेक मुले मरत असत.
आजारी मानसिकतेवरही उपचार केले जात होते Yogi Adityanath।
मागील सरकारांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, आठ वर्षांत सरकारने केवळ एन्सेफलायटीस आणि त्याच्या कारणांवरच उपचार केले नाहीत तर राज्याला आजारी स्थितीत आणणाऱ्या “आजारी मानसिकतेवर” देखील उपचार केले. योगी आदित्यनाथ म्हणाले की, एका वर्षात राज्य सरकारने गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून ११०० कोटी रुपये दिले आहेत.





