न्हावी सांडस तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी योगेश शितोळे
Updated On:

वाघोली : न्हावी सांडस तालुका हवेली येथील ग्रामसभेत योगेश रामचंद्र शितोळे यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामस्थांच्यावतीने निवडीबद्दल शितोळे यांच्या सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बाळासाहेब शितोळे, नामदेव शितोळे, प्रदीप कांबळे, संदीप शितोळे, संतोष शितोळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील तंटे गावातच मिटवून सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश शितोळे यांनी सांगितले.


