Bigg Boss Marathi 5: ‘होय, आमचा पॅडी ‘जोकर’च आहे’; अभिजीत केळकरने जान्हवीला सुनावले…

Bigg Boss Marathi Season 5 | बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सतत वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेदार इतर स्पर्धकांना चुकीच्या पद्धतीने बोलताना दिसतात. निक्की आणि जान्हवीने भांडणात दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा अपमानही केला होता. यावरून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. यानंतर आता जान्हवीने पंढरीनाथ (पॅडी) कांबळेचा अपमान करत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत.
पॅडी कांबळेचा बिग बॉसच्या घरात जान्हवीने जोकर म्हणून उल्लेख केला. त्यानंतर तिने पॅडीला त्याच्या कामावरुन आणि अभिनयावरुनदेखील हिणवलं. या संपूर्ण प्रकरणानंतर आता मराठी अभिनेता आणि बिग बॉस फेम अभिजीत केळकरने पोस्ट लिहिली आहे.
अभिजीत केळकरची पोस्ट Bigg Boss Marathi Season 5 |
‘होय, आमचा पॅडी ‘जोकर’च आहे… कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा…slapstick चा हुकमी एक्का…गायन आणि नृत्याच्याही राज्यात सहज मुशाफिरी करणारा हरहुन्नरी, चतुरस्त्र अभिनेता. बऱ्या वाईट परिस्थितीतून, आयुष्यातल्या ups n downs मधून ताऊन सुलाखून निघालेला…पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि ह्या सगळया सगळ्याचा वागण्या बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस…
View this post on Instagram
मित्रा, तुझ्या संयमाला साष्टांग नमस्कार आणि तुला एक जोरदार जादू की झप्पी…मी आत्ताच तुझी finaleची AV बघतोय…ह्या पालापाचोळ्याला तू तुझ्या हुशारीने कसं “छू” केलंयस. त्यांचं त्यांनाही कळलं नाहीये. हा संयम ढळू देऊ नकोस आणि काहीही झालं तरी nervous होऊ नकोस. तू आत भीड, आम्ही तुझ्यासाठी बाहेर आहोतच… रितेशभाऊ, कलर्स मराठी…पॅडीबद्दल जे बोललं गेलंय ते ही अक्षम्यच आहे. पॅडी कांबळे आणि वर्षा उसगावकर ताईंनी माफ केलं असेल कदाचित, पण आम्ही कधीच करणार नाही,’ असे अभिजीत केळकर त्याच्या पोस्टमध्ये बोल ताना दिसत आहे. Bigg Boss Marathi Season 5 |
जान्हवी नेमकं काय म्हणाली?
टास्कनंतर जान्हवी म्हणाली, “पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हा जान्हवी “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही,” असे म्हणाली. जान्हवीचे वागणे पाहून प्रेक्षकांनी देखील संताप व्यक्त केला असून तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा :
“तुम्ही तुमचा अहवाल तुमच्याकडे ठेवा…” ; कोलकाता प्रकरणात उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले





