पिवळी साडी अन् नाकात नथ… शोभिता धुलिपालाचा हळदी समारंभातील खास लुक

Sobhita Dhulipala- Naga Chaitanya | अभिनेता नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यापूर्वी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ पार पडला. शोभितानं हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शोभिता पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे, त्यासोबत तिने ऑफ शोल्डर ब्लाऊज वेअर केला होता.
नागा चैतन्यची होणारी नवरी शोभितानं आपल्या हळदी समारंभासाठी ट्रेडिशनल लूक कॅरी केला होता. त्यासोबत तिनं गोल्ड ज्वेलरी मॅच केली होती. तिनं नाकात नथही घातली होती. सध्या तिच्या या लुकवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. दरम्यान, नागा चैतन्य आणि शोभिता 4 डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
दोघांचं लग्न हैदराबादमध्ये होणार आहे. अभिनेत्रीनं लेटेस्ट फोटोंमध्ये हळदी समारंभ सुरू होण्यापूर्वी फोटोशूट केलं आहे. हळदी समारंभात नागा चैतन्य कुर्ता पायजमामध्ये दिसला होता.
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा आणि अभिनेता नागा चैतन्य पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. अभिनेत्री समंथा रूथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाला आपली जीवनसाथी बनवणार आहे. दरम्यान, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला २०२२पासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याने ८ ऑगस्ट २०२४ रोजी हैदराबादमध्ये त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. आता हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहे.





