‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीचा १५ वर्षांचा संसार मोडला; पतीपासून विभक्त होण्याचा घेतला निर्णय

Lata saberwal | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री लता सबरवाल आणि अभिनेते संजीव सेठ लग्नाच्या 15 वर्षानांतर घटस्फोट घेत आहेत. लता सबरवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. दोघांनीही वेगळा होण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लता यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ‘मी पती संजीव सेठ यांच्यापासून वेगळी झाली आहे. मला प्रेमळ मुलगा देण्यासाठी त्यांचे आभार मानते. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते की, कृपया माझ्या कुटुंबाच्या शांतीचा सन्मान करावा’. लता यांनी पोस्टमध्ये संजीव सेठ यांचे आभार मानले आहेत. तसंच या प्रसंगी प्रायव्हसी द्यावी अशी विनंती माध्यमांना आणि चाहत्यांना केली आहे.
लग्नानंतर १५ वर्षांनी वेगळं होण्याचा घेतला निर्णय
लता सबरवाल आणि संजीव सेठ दोघंही हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक मालिकामध्ये काम केलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत दोघं पती पत्नीच्या भूमिकेत होते. २०१० मध्ये लता आणि संजीव सेठ यांनी लग्नगाठ बांधली होती. २०१३ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव आरव सेठ आहे. आता लग्नानंतर १५ वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. Lata saberwal |
संजीव सेठ यांची लता सबरवाल दुसरी पत्नी आहे. तर त्यांची पहिली पत्नी मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस होती. १९९३ मध्येच त्यांचं लग्न झालं होतं. रेशमपासूनही त्यांना रिषीका आणि मानव ही दोन मुलं आहेत. २००४ साली रेशम टिपणीससोबत त्यांचा घटस्फोट झाला होता. Lata saberwal |
हेही वाचा :





