‘ये जवानी है दीवानी’ पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई

Yeh Jawaani Hai Deewani re-release: सध्या जुन्या चित्रपटांना पुन्हा रिलीज करण्याचा ट्रेंड वाढला आहे. तुंबाड, कल हो ना हो सारखे अनेक लोकप्रिय चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी पाहायला मिळाली. आता या यादीमध्ये 2013 साली आलेल्या ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपटाचा देखील समावेश आहे. पुन्हा रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट 3 जानेवारी 2025 ला पुन्हा रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे 11 वर्षानंतर पुन्हा रिलीज झाल्यानंतर देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये प्रचंड गर्दी केली आहे. पुन्हा रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 1 कोटी 20 लाख रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे. आठवड्याभरात चित्रपट 6 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई करण्याची शक्यता आहे.
2013 ला रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने भारतात 188.57 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात 318 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा गाठला होता. आता पुन्हा एकदा रिलीजनंतर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. तर रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, कल्की कोचलीन, आदित्य रॉय कपूर, फारुक शेख या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.





