Year Ender 2024 : ‘या’ भारतीय राजकारण्यांनी 2024 मध्ये घेतला जगाचा निरोप

मुंबई : 2024 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष होते. यावर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. तसंच, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यावर्षी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. तसेच यावर्षी अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी जगाचा निरोप देखील घेतला. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे जाणून घेऊया…
बाबा सिद्दिकी
महाराष्ट्रातील काँग्रेसचे चारवेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांची काही अज्ञात व्यक्तींकडून गोळीबा करून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
सीताराम येचुरी
भारतातील कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या सीताराम येचुरी यांचं १२ सप्टेंबर २०२४ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. ते २००५ ते २०१७ या काळात पश्चिम बंगालचे राज्यसभा खासदार होते.ते कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव देखील होते. पार्टी ऑफ इंडिया आणि १९९२ पासून पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे ते सदस्य राहिले आहेत.
सुशील कुमार मोदी
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं १३ मे २०२४ रोजी निधन झालं. २००५ ते २०१३ आणि पुन्हा २०१७ ते २०२० दरम्यान त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांचे कर्करोगाने निधन झाले.
नटवर सिंग
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या युपीए सरकारमधील परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते नटवर सिंग यांचं १० ऑगस्ट २०२४ रोजी निधन झालं. सिंग यांनी भारतीय परराष्ट्र सेवा म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९५३ मध्ये अधिकारी आणि लोकसभा खासदार म्हणून राजकारणात प्रवेश करण्यासाठी १९८४ मध्ये त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली होती.
जित्ता बाळकृष्ण रेड्डी
भारत राष्ट्र समितीचे नेते जित्ता रेड्डी यांचे ६ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. रेड्डी यांनी टीआरएसचा युवा नेता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.





