Satara | यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये
Updated On:

फलटण, – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेच्यावतीने घेण्यात येणारे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन यंदा डिसेंबरमध्ये होणार आहे, अशी माहिती शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेच्यावतीने आणि सद्गुरू प्रतिष्ठान आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन 2012 पासून करण्यात येत आहे.
हे संमेलन दरवर्षी दि. 25 नोव्हेंबर रोजी होते; परंतु नुकतीच पार झालेली विधानसभा निवडणूक आणि अन्य काही अपरिहार्य कारणांमुळे हे संमेलन यावर्षी दि. 25 नोव्हेंबर रोजी आयोजित केले जाणार नाही.
यावर्षी या संमेलनाचे तप पूर्ण होत आहे. डिसेंबर महिन्यात या संमेलनाचे शानदार आयोजन केले जाईल, असे बेडकिहाळ यांनी पत्रकात नमूद केले आहे.





