दिल्ली निकालावरून यशवंत सिन्हांनी उडवली भाजपची खिल्ली
Updated On:

नवी दिल्ली – माझ्या जुन्या पक्षाने दिल्लीतील आपल्या जागा दुप्पट वाढवल्या आहेत, काय धमाकेदार परफॉर्मन्स आहे, त्यांचे अभिनंदन असे ट्विट करीत भाजपचे माजी नेते व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. पुर्वीच्या विधानसभेत भाजपच्या तीन जागा होत्या त्या आता आठ झाल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी ही खिल्ली उडवली आहे.
यशवंत सिन्हा यांच्या या ट्विटर संदेशात तांत्रिकदृष्ट्या काही चुक नाही, भाजपच्या जागा खऱ्याच दुप्पट झाल्या आहेत पण त्या मागचा त्यांचा हा उपरोध भक्तांच्या लक्षात येणार नाही असा टोमणा त्यांच्या ट्विटवर डॉ. गौरव गर्ग यांनी मारला आहे. अन्य नेटकऱ्यांनी याच पार्श्वभूमीवर अदनान सामी यांच्या एका गाण्याचा उल्लेख करीत थोडीसी तो लिफ्ट करालो असा उल्लेख करीत भाजपची खिल्ली उडवली आहे.





