यशश्री शिंदे हत्या प्रकरणाला नवे वळण ? यशश्रीच्या अंगावरील ‘तो’ टॅटू बदलणार तपासाची दिशा

नवी मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकारणात रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. आता या प्रकरणात अशी एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे यशश्री शिंदे हत्या प्रकरणाच्या तपासाला नवीन वळण मिळू शकते. मृतहेदाचे शवविच्छेदन करताना यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू (गोंदलेलं) आढळले आहेत. यामध्ये टॅटूमध्ये आरोपी दाऊद शेख याचं नावही मिळालं आहे अशी माहिती समोर आली आहे.
‘तो’ टॅटू बदलणार तपासाची दिशा
शवविच्छेदनादरम्यान मृत यशश्री शिंदे हिच्या शरीरावर 2 टॅटू आढळले होते. यशश्री शिंदे हिच्या शरीरावरील या टॅटूमध्ये तिने आरोपी दाऊद शेखचे नाव लिहिले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्रीने हा टॅटू तिच्या शरीरावर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काढला होता आणि हा टॅटू काढताना दाऊद शेखही तिच्यासोबत होता. दाऊद शेखने यशश्रीला टॅटू काढण्यास भाग पाडले की तिच्या संमतीने हे केले गेले, याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
काय घडले नेमके?
प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सूडाने पेटलेल्या आरोपीनं यशश्रीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. यशश्री शिंदे भेटायला येत नसल्याने आरोपी दाऊद शेख चिडला होता. तिने लग्नाला नकार दिल्याने त्याच्या रागात भर पडली. सोबत येण्यासाठी तो तगादा लावत होता. त्याचा तगदा आणि सतत होण्याऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीनं आला होता. तिथे त्यांच्यात वाद सुरू झाले आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सपासप वार केले आणि तिला संपवलं.
हत्येच्या दिवशी यशस्वी ने तिच्या एका मित्राला फोन करून मदत मागितली मात्र नेटवर्क नसल्यामुळे दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. हत्येनंतर दाऊद यशश्रीचा मोबाईल आणि हत्यार घेऊन कळंबोली येथून कर्नाटकची बस पकडून गावी निघून गेला. याप्रकारणात अद्याप यशश्रीचा मोबाईल आणि हत्या केलेले हत्यार पोलिसांना सापडले नसून आरोपीज्या फोटो द्वारे ब्लॅकमेल करत होता त्या फोटोचा शोध देखील पोलीस घेत आहेत.





