Yashomati Thakur : वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह विधानावरून यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना दिला इशारा; म्हणाल्या …

अमरावती : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी एका भरसभेत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्याचे वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. विरोधकांनी या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यादरम्यान काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत फडणवीसांना इशारा दिला आहे.
काय म्हणाल्या यशोमती ठाकूर ?
बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर याद राखा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
ज्यांनी महिलांना प्रोटेक्शन करून आमदारकी घेतली आहे ते आता झोपले आहेत का? यामधून महिलांप्रती आरएसएस आणि भाजपची काय मानसिकता आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली.
काय म्हणाले होते वसंतराव देशमुख?
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यासभेत सुजय विखे मंचावर असताना भाजपचे वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. आपल्या कन्येला समजवा…नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही.
सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे, असं वक्तव्य वसंत देशमुख यांनी केले. वसंत देशमुखांच्या या विधानानंतर संगमनेरमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.





