यमुनोत्रीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भाविक, पोलिसांचे आवाहन,’आज प्रवास करू नका, अन्यथा…’

Yamunotri Dham । उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे असलेल्या यमुनोत्री धामला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढती गर्दी आणि धोका लक्षात घेता उत्तरकाशी पोलिसांनी आता लोकांना यमुनोत्री धाममध्ये न येण्याचे आवाहन केले आहे. असे आवाहन पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी पोहोचले. अधिक भाविक तेथे गेल्यास धोका वाढू शकतो. त्यामुळे पोलिसांनी हे आवाहन केले आहे. सकाळी ६ वाजता उत्तरकाशी पोलिसांनी आपल्या एक्स अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून यमुनोत्री यात्रेचे व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त भाविक यमुनोत्रीला पोहोचत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, अशात प्रशासनाला आता लोकांच्या सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे.
#आवश्यक_सूचना
आज श्री यमुनोत्री धाम पर क्षमता के अनुसार पर्याप्त श्रद्धालु यात्रा के लिये पहुँच चुके हैं। अब और अधिक श्रद्धालुओं को भेजना जोखिम भरा है। जो भी श्रद्धालु आज यमुनोत्री यात्रा पर आने जा रहे हैं, उनसे विनम्र अपील है कि आज यमुनोत्री जी की यात्रा स्थगित करें।— Uttarkashi Police Uttarakhand (@UttarkashiPol) May 12, 2024
दरम्यान, केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत, त्यामुळे हजारो भाविक येथे पोहोचत आहेत. उत्तराखंडच्या चारधाम यात्रेत यमुनोत्रीचाही समावेश आहे. अशात केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धामसोबतच प्रवासीही यमुनोत्रीकडे वळत आहे.
यात्रा सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले होते की,’यावेळी चार धाम यात्रेतील यात्रेकरूंच्या संख्येचे सर्व रेकॉर्ड मोडले जातील. राज्य सरकारनेही यासाठी व्यवस्था केली आहे, मात्र प्रवास सुरू होताच क्षमतेपेक्षा जास्त भाविक यमुनोत्री धाममध्ये पोहोचले.’
अनेक किलोमीटरपर्यंत प्रवासी अडकून पडले
यमुनोत्री धाम यात्रा सुरू झाल्यानंतर समोर येणारी चित्रे भयावह आहेत.यमुनोत्री धाम तीर्थक्षेत्रातच हजारो भाविक दिसत असल्याचे व्हिडिओ आणि फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. शेकडो मीटरचा पादचारी मार्ग ठप्प झाला होता. १० मेपासून सुरू झालेल्या या प्रवासाचा रविवारी तिसरा दिवस आहे. परंतु, भाविकांची संख्या लक्षात घेता ही यात्रा रविवारपर्यंत पुढे ढकलण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सकाळी सहा वाजण्यापूर्वीच पुरेसे प्रवासी येथे पोहोचले आहेत.





