Adinath Kothare: आदिनाथ कोठारेसोबत काम करण्याचा यामीने शेअर केला अनुभव; म्हणाली…
Adinath Kothare: ‘नई नवेली’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार

Adinath Kothare: अभिनेता आदिनाथ कोठारे ‘नई नवेली’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात अभिनेत्री यामी गौतमी त्याच्यासोबत मुख्यभूमिकेत झळकणार आहे. हॉरर, कॉमेडी आणि फॅमिली ड्रामाचा मिलाफ असलेल्या या चित्रपटात आदिनाथ एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात यामी गौतम आणि आदिनाथ कोठारे एकत्र स्टेजवर होते. त्यावेळी आदिनाथसोबत काम करुन यामी गौतमने तिचा अनुभव शेअर केला आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे यामीच्या पतीची भूमिका साकारत आहे. ‘नई नवेली’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात यामी गौतम पहिल्यांदा स्टेजवर आली. तिने चित्रपटाबाबतचा तिचा अनुभव शेअर केला.
यावेळी सूत्रसंचालकाने यामीला आदिनाथसोबतच्या कामाविषयी विचारले. तेव्हा ती म्हणाली, ”खूप मजा आली यांच्यासोबत काम करताना… खूप मजा आली. पण ते शूटिंगच्या वेळी खूप गंभीर असायचे.”
View this post on Instagram
आदिनाथ कोठारे सध्या ‘रामायण’ या बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपटामुळेही चर्चेत आहे. ‘रामायण’नंतर आता ‘नई नवेली’च्या माध्यमातून त्याची आणखी एक वेगळी भूमिका प्रेक्षकांसमोर येणार आहे.
आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली निर्मिती
‘नई नवेली’ची निर्मिती चित्रपट निर्माते आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली होत आहे. बालाजी मोहन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. ‘नई नवेली’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
International Coffee Day 2026: कॉफीप्रेमींनो, जरा सावध! कॉफी पिताना होणाऱ्या ‘या’ 7 चुका टाळा





