लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी खासगी कार्यक्रमात विवाह उरकून घेतले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे या समारंभांना पाहुण्यांची गर्दी नसायचीच.
View this post on Instagram
अगदी निवडक मित्रमंडळींच्या उपस्थितीत हे समारंभ झाले. त्यामध्ये आता यामी गौतमचीही भर पडली आहे. यामी गौतमचे अलीकडेच आदित्य धर बरोबर लग्न झाले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर अचानक यामीच्या विवाहाचे फोटो बघून यामीचे फॅन चक्रावलेच होते. मात्र नंतर त्यांनी यांमीला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. या शुभेच्छा देणे अजूनही सुरूच आहे. यामीने इन्स्टाग्रामवर मेंदीच्या कार्यक्रमाचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
यामी गौतमने हिमाचली रितीने मंडी जिल्ह्यातील गोहर उपविभागातील न्योरी गावातल्या तिच्या फार्म हाऊसमध्ये गुप्तपणे लग्न केले,हे त्यावरून समजते आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये यामीने “मेरे प्रिया कशाला चिंता करता. जे तुमचे आहे, ते तुला नक्की मिळेल.’ अशी रोमॅंटिक ओळ लिहिली आहे.
View this post on Instagram
तिच्या शेजारी बसलेल्या आदित्य धरकडे बघत ती स्मितहास्य करते आहे. यामी आणि आदित्यने “उरी-सजिॅकल स्ट्राईक’साठी एकत्र काम केले होते. आदित्यने या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम केले होते. खासगी समारंभ असल्यानुळे या समारंभाबाबत कोणालाच माहिती नव्हते. यामीने आपल्या फॅन्सकडे शुभेच्छा आणि आशीर्वादांची अपेक्षा केली आहे.