Yami Gautam : नुकताच धुरंधर २ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला. येत्या १९ मार्चला हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अभिनेता रणवीर सिंहला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ट्रेलरमधून चित्रपटात रणवीरचे पात्र अधिक विस्ताराने दाखवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच आता नवीन एक माहिती समोर आली असून, चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) देखील झळकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात यामी एका खास भूमिकेत दिसणार आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या रिपोर्टनुसार, यामी गौतमची (Yami Gautam) विशेष भूमिका चित्रपटात दाखवण्यात येणार असून, तिच्या भूमिकेमुळे एक महत्त्वाचा ट्विस्ट कथेत येणार असल्याचे सांगितले जात आहे. तिचा कॅमिओ रोल असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्यापर्यंत याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मेन्सएक्सपीच्या दिलेल्या वृत्तानुसार, “उरी: द सर्जिकल स्ट्राईक” या चित्रपटात यामीने एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. जी सशस्त्र दलांशी जवळून काम करते. Yami Gautam या चित्रपटात तसा काही रोल तिचा असणार का याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, धुरंधर २ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिची भूमिका काय असणार हे स्पष्ट होईल. यामी गौतम या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आहे. रणवीर सिंहचे पुनरागमन Yami Gautam रणवीर सिंह लियारीच्या राजा (हमजा अली मजारी उर्फ जसकीरत सिंग रंगी) ची भूमिका पुन्हा साकारणार आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्याचा खतरनाक लूक पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याने हे पात्र मजबूत, शक्तिशाली आणि प्रभावी बनवले आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि इतर अनेक कलाकार दिसतील. धुरंधर २ मध्ये रणवीरचा रोल अधिक दाखवणार जाणार असल्याचे सांगितले जात आहे. हेही वाचा : Jahnavi Killekar : “…एकतर माती खाऊन बाहेर येता”; जान्हवीने किल्लेकर रुचितावर संतापली