Yamaha YZF-R2 भारतात लॉन्च; 2.53 लाखांपर्यंत किंमत, 204cc इंजिनसह मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
Yamaha YZF-R2 भारतात लॉन्च झाली असून तिची किंमत 2.30 ते 2.53 लाख रुपये आहे. 204cc इंजिन, ट्रॅक्शन कंट्रोल, 3 रायडिंग मोड आणि ABSसह जाणून घ्या फीचर्स.

Yamaha YZF-R2 : स्पोर्ट्स बाइकप्रेमींसाठी यामाहाने भारतीय बाजारात आपल्या R-Series मधील नवीन YZF-R2 लॉन्च केली आहे. 204cc इंजिन, ट्रॅक्शन कंट्रोल, तीन रायडिंग मोड आणि ड्युअल-चॅनल ABS यांसारख्या फीचर्समुळे ही बाइक चर्चेत आली आहे. YZF-R2 ची एक्स-शोरूम किंमत 2.30 लाख ते 2.53 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
कंपनीच्या Blue Square डीलरशिपमधून या बाइकची विक्री सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. बाइकचे बुकिंग सुरू झाले असून ग्राहक 10 हजार रुपयांच्या रिफंडेबल टोकन अमाउंटसह बुकिंग करू शकतात.
204cc इंजिन, 26.5hp पॉवर –
Yamaha YZF-R2 मध्ये 204cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 26.5hp पॉवर आणि 19.1Nm पीक टॉर्क निर्माण करते. त्यामुळे कामगिरीच्या बाबतीत ही बाइक R15 पेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे मानले जात आहे.
बाइकला हलक्या डायमंड फ्रेमवर तयार करण्यात आले असून या फ्रेमचे वजन सुमारे 14 किलो आहे. YZF-R2 चे कर्ब वजन 149 किलो आहे. कमी वजनामुळे बाइक हाताळणे आणि चालवणे अधिक सोपे होण्याची अपेक्षा आहे.
तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध –
Yamaha YZF-R2 तीन वेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. तिन्ही वेरिएंटमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, स्लिपर क्लच, ड्युअल-चॅनल ABS आणि 5-इंच TFT डिस्प्ले स्टँडर्ड देण्यात आला आहे. याशिवाय Street, Sport आणि Rain असे तीन रायडिंग मोड मिळतात.
मधल्या वेरिएंटमध्ये बायडायरेक्शनल क्विक शिफ्टर आणि बॉडी-कलर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. क्विक शिफ्टरमुळे क्लच न वापरता गिअर वर-खाली करणे शक्य होते.
लाइनअपमधील टॉप R2M वेरिएंटमध्ये अॅडजस्टेबल फ्रंट फोर्क, अॅडजस्टेबल लीव्हर आणि फॉक्स-सुएड सीट मिळते. यासोबत वेगळे कॉस्मेटिक टच आणि एम्बॉस्ड बॅजिंग देऊन हा वेरिएंट अधिक प्रीमियम बनवण्यात आला आहे.





