Satara | कोर्टाच्या आरक्षण विरोधी निर्णयाविरोधात वाई १०० टक्के बंद

वाई, (प्रतिनिधी) – आरक्षण समर्थक संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या वाई बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सुप्रीम कोर्टाच्या वतीने एससी, एसटीचे जाती जमातीमध्ये वर्गीकरण व क्रिमिलियर लागू करणे संबंधी असंविधानिक निर्णय दिल्याच्या विरोधात गुरुवारी वाई शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.
या निर्णयाचा तसेच देशात व राज्यात अनेक ठिकाणी लहान मुली व महिलांवर होणारे अत्याचार याचाही निषेध करण्यात आला.
या बंदला वाई व्यापारी महासंघ यांचे योग्य सहकार्य लाभले. दि. २१ आॅगस्ट राेजी भारत बंदची घाेषणा करण्यात आली हाेती. मात्र, याबद्दल माेठ्या शहरातील व्यापारी, छोटे दुकानदार व्यावसायिक यांना वेळेत न मिळाल्यामुळे काल वाई बंद करता आली नाही.
सामान्य वाईकर जनता व व्यापारी यांचा विचार करून महासंघातील सर्व पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करू कालचा बंद आज घेण्यात आला. त्यामुळे या बंदला समस्थ वाईकरांनी १००% पाठिंबा दिला. या बंद मध्ये वाई तालुका व शहरातील सर्व आरक्षण समर्थक सर्व राजकीय सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.





