Xi Jinping : संयुक्त राष्ट्राचा अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चीन आणि रशियाने एकत्रितपणे काम करायला हवे. आंतरराष्ट्रीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, अधिक नेमकेपणाने आणि जबाबदार करण्यासाठी दोन्ही देशांनी मिळून ब्रिक्स आणि एससीओ या मंचांमध्ये सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी व्यक्त केली आहे. बीजिंगमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान, शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक एकतर्फी कृतींविरुद्ध दोन्ही देशांनी प्रयत्न तीव्र करण्याचे आवाहनही केले. जिनपिंग यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या इराण युद्धावर टीका करायला सुरुवात केली आहे. जगाला पुन्हा रानटी कायद्याच्या खाईत लोटण्यापासून रोखले पाहिजे. बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारीत रचना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी रशिया आणि चीनसारख्या समविचारी देशांनी एकमेकांना सहकार्य करायला हवे, असे ते म्हणाले. Xi Jinping आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा विकास अधिक न्याय्य आणि वाजवी दिशेने पुढे नेण्यासाठी, बहुपक्षीय सहकार्य बळकट करणे, बहुपक्षीयवादाला ठामपणे पाठिंबा व प्रोत्साहन देणे, संयुक्त राष्ट्रांचा अधिकार आणि चैतन्य पुनः प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी लावरोव्ह यांना सांगितले. जिनपिंग (Xi Jinping) हे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे चांगले मित्र मानले जातात. दोन्ही देशांनी सर्व आघाड्यांवर सहकार्य अधिक दृढ करणे, आणि आपापल्या विकासाची लवचिकता वाढवण्यावर भर दिला आहे.