WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दक्षिण अफ्रिकेची प्लेइंग 11 जाहीर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पार पडणार आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ आयसीसी चषकाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. कारण आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात 1998 नंतर त्यांना एकही कप जिंकता आलेला नाही. जवळपास 27 वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांना विजेतेपद पटकावण्याची संधी चालून आली आहे.
दक्षिण अफ्रिकेने जाहीर केली प्लेइंग 11
दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सामन्याच्या एक दिवस आधीच प्लेइंग 11 जाहीर केली आहे.सलामीला कर्णधार टेम्बा बावुमासोबत एडन मार्करम येणार आहे. सामन्याच्या सुरुवात टेम्बा बावुमा करणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रायन रिकेल्टनला संधी देण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकावर वियान मुल्डर फलंदाजीसाठी येईल. तर पाचव्या क्रमांकासाठी ट्रिस्टन स्टब्सला पसंती देण्यात आली आहे.
सहाव्या क्रमांकावर म्हणजेच मधल्या फळीत डेविड बेडिंगहॅम धुरा सांभाळेल. तर काइल वेरीन सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत मार्को यानसेन असेल आणि तो आठव्या क्रमांकावर येईल. तर केशव महाराजकडे फिरकीची जबाबदारी असेल. कगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
हेड टू हेडमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टेस्ट क्रिकेटमध्ये 101 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाने 101 सामन्यांपैकी 54 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने फक्त 26 सामने जिंकले आहेत. 21 सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारतात WTC फायनल कुठे आणि कधी पाहता येईल?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. तसेच, या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग जिओहॉटस्टार ॲपवर उपलब्ध असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरीन, मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.





