Tisca Chopra : बॅालीवूडमधील असे अनेक कलाकार आहेत की त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनाचे कौशल्य देखील आत्मसात केले आहे. यामध्ये आता अभिनेत्री टिस्का चोप्रा हिच्या नावाचा समावेश झाला आहे. अभिनेत्रीने २०२५ मध्ये दिग्दर्शनात पदार्पण करत “साली मोहब्बत” हा थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री टिस्का चोप्राने बॅालीवूडमध्ये लेखनाच्या लिखाणाला हवा तसा वाव मिळत नसल्याचा दावा करत नाराजी व्यक्त केली आहे. बॉलीवूडमध्ये निर्माते सर्जनशील दृष्टिकोनातून कोणतीही जोखीम घेण्यास खूप घाबरतात असे मत व्यक्त करत ते लेखनाकडे कमी लक्ष देतात, असा दावा अभिनेत्रीने केला आहे. यानंतर आता बॅालीवूड इंडस्ट्रीत जोरदार चर्चा झडू लागल्या आहेत. बॅालीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीमधील कमतरतांवर प्रकाश टाकला त्या दूर करण्याचे आवश्यक असल्याचे देखील म्हटले आहे. “समस्या अशी आहे की आपण फळांना पाणी घालत आहोत, मुळांना नाही, जे लेखन आहे. काम खूप वरवरचे झाले आहे. मी असे म्हणत नाही की व्यावसायिक किंवा विनोदी चित्रपट बनवता येत नाहीत, परंतु ते लेखनापासून सुरू होते.” असे देखील अभिनेत्रीने म्हणाली आहे. तसेच तुम्ही तुमच्या लेखकांच्या कल्पनांबद्दल विचार करण्यासाठी वेळ आणि स्वातंत्र्य दिले पाहिजे, तरच ते काहीतरी सर्जनशील बनवू शकतील. पण आपल्याकडे लेखकांना प्रोत्साहन दिले जात नाही. त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते. यासाठी कोणीही जोखीम घ्यायला कोणीही तयार नसल्याचे स्पष्ट मत अभिनेत्री टिस्का चोप्राने व्यक्त केले आहे. हेही वाचा : इराणमध्ये खामेनीविरोधी तीव्र निदर्शने ; ट्रम्पच्या पाठिंब्यामुळे Gen Z चे बंड, ८ निदर्शकांचा मृत्यू