वुमेन्स प्रिमियर लीगला 14 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सामने झाले आहेत. यामध्ये पहिला सामना आरसीबीने तर दुसरा सामना दिल्लीच्या संघाने जिंकला आहे. तर आज तिसरा सामान गुजरात जाएंटस आणि युपी वॉरियर या दोन संघांमध्ये होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीची स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर पडली आहे. श्रेयंका पाटील स्पर्धेतून बाहेर रॉयल चॅलेंजर्सची प्रमुख खेळाडू श्रेयंका पाटील WPL 2025 मधून बाहेर पडली आहे. आता तिच्या जागी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात जायंट्सच्या एका खेळाडूचा संघात समावेश केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०२५ च्या महिला प्रीमियर लीगच्या उर्वरित सामन्यांसाठी स्नेहा राणाला संघात समाविष्ट केले आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्नेहा राणाला ३० लाख रुपयांना संघात सामील केले आहे. RCB ने केली भावनिक पोस्ट दुखापतीमुळे श्रेयंका पाटील WPL 2025 मधून बाहेर पडल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “आव्हाने कठीण आहेत श्रेयंका, पण तू त्यांच्यापेक्षा बलवान आहेस. WPL 2025 च्या आधी तू तंदुरुस्त होण्यासाठी किती प्रयत्न केलेस आणि या स्पर्धेचा भाग नसल्याबद्दल तुला किती पश्चात्ताप होईल हे आम्हाला माहित आहे. पण आम्ही तुमची ऊर्जा आणि आवड आमच्यासोबत मैदानावर घेऊन जाऊ.” असे RCB ने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. तसेच “लवकर बरे व्हा आणि पूर्वीपेक्षाही मजबूत होऊन परत या. पुढच्या वर्षी तुम्हाला आरसीबीच्या लाल, निळ्या आणि सोनेरी रंगात पाहण्याची उत्सुकता आहे.” असेदेखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. श्रेयंका पाटीलची कामगिरी श्रेयंका पाटीलच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तिने आतापर्यंत 15 सामने खेळले आहेत. या 15 सामन्यांमध्ये 147.27 च्या स्ट्राईक रेटने 81 धावा केल्या आहेत. तसेच 18.36 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या आहेत.