Jaya Bachchan : ‘अरे जया बच्चन हसतात सुद्धा…’ अमिताभ बच्चन-गुलजार यांच्यासोबतचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क
Jaya Bachchan : जया बच्चन यांचा कार्यक्रमातील अंदाज बदलेला पाहायला मिळाला

Jaya Bachchan : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन अनेकदा पापाराझींपासून दूर जाताना त्यांच्यावर संताप व्यक्त करताना पाहायला मिळाला आहे. मात्र अलीकडेच त्यांचा एका कार्यक्रमात वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. मुंबईत आयोजित एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते अमिताभ बच्चन आणि लेखक-गीतकार गुलजार एकत्र दिसले.
या कार्यक्रमात जया बच्चन केवळ कॅमेऱ्यासमोर पोज देतानाच दिसल्या नाहीत, तर मनमोकळेपणाने हसताना दिसून आल्या. जया बच्चन यांचा हा अंदाज आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले. सोशल मीडियावर दोघांचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात जया बच्चन यांचा अंदाजपू र्ण बदलेला पाहायला मिळाला.
View this post on Instagram
जयाजींचा मनमोकळा आणि बिनधास्त अंदाज
कार्यक्रमाच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये या तिन्ही दिग्गज व्यक्ती एकत्र फोटो काढताना दिसत आहेत. फोटोग्राफर्ससमोर जयाजींचा हा मनमोकळा आणि बिनधास्त अंदाज पाहून तिथे उपस्थित असलेले लोक आणि चाहते थक्क झाले. याच कार्यक्रमातील आणखी एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यात जया बच्चन यांनी गुलजार यांना घट्ट मिठी मारली आहे. व्हिडीओमध्ये अमिताभ आणि जया स्टेजवरून खाली उतरत असताना सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नी तिथे येतात. दोघे अमिताभ यांच्या पाया पडतात.
यावर एका युजरने आश्चर्य व्यक्त करत लिहिले, ‘अरे! जयाजी हसतात सुद्धा?’, तर दुसऱ्याने कमेंट केली, ‘पहिल्यांदाच हसताना पाहिले’. अनेक लोकांना या संपूर्ण प्रसंगातील अमिताभ, जया आणि गुलजार यांची बाँडिंग खूप आवडली. या तिन्ही दिग्गजांना एकत्र पाहणे स्वतःतच खास होते, पण जया यांचा हा आनंदी अंदाज या भेटीतील सर्वात जास्त चर्चेत राहिलेली गोष्ट ठरला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जया बच्चन लवकरच ‘दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा:





