अबब… पु्ण्याच्या मार्केटमध्ये तब्बल अडीच किलोचा एक आंबा, दर जाणून घ्या
Updated On:

पुणे – मार्केट यार्डात तब्बल अडीच किलो वजन असलेल्या आंब्याची आवक झाली आहे. हा आंबा अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. बाजारात दिवसभर या आंब्याचीच बाजारात चर्चा होती.
कर्नाटक येथून दाखल झालेल्या या आंब्याच्या किलोला ६० ते ७० रुपये भाव मिळाला. फळबाजारातील डी. बी. उरसळ अॅण्ड सन्स फर्मवर ही आवक झाली. कर्नाटकात या आंब्याला खुदादाद या नावाने ओळखले जाते. या आंब्याची कोय, साल लहान असते तर, गर अधिक प्रमाणात असतो.
याची गोडी साधारण असते. मंगळवारी (दि.१३) बाजारात २० ते ३० किलोच्या पाच क्रेटस्मधून ही आवक झाली. यामध्ये आंब्याचे सरासरी वजन हे दोन ते अडीच किलो होते. लष्कर परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी या साठ्याची खरेदी केल्याची माहिती आडतदार रोहन उरसळ यांनी दिली.





