लडाख आणि काश्मीर खोऱ्यातील बांधव करणार आरती
पुणे – महाराष्ट्र आणि काश्मीर या दोन राज्यातील सांस्कृतिक परंपरांचे देवाण-घेवाण होण्यासाठी “पुणे काश्मीर सांस्कृतिक मंचा’तर्फे विघ्नहर्ता गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. यात एक दिवसाचा गणेशोत्सव सरदार विंचुरकर वाडा येथे साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र आणि काश्मीर या दोन्ही राज्यांच्या संस्कृतीत विविधांगी रूपे पाहावयास मिळतात. यंदा प्रथमच दोन्ही संस्कृती एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करणार आहेत.
यामध्ये सोमवारी दुपारी 2 वाजता गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, काश्मीरमधील सिंधू, चिनाब, दोडा, झेलम व तावी नद्यांच्या पाण्याने पाद्यपूजा व त्या भागातील मातीवर मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तसेच लडाख आणि काश्मीर खोऱ्यातील बांधवांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. याचबरोबर, काश्मिरी पद्धतीचा आणि मोदक या प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.