सातारा -जिल्ह्यात काल (दि. 22) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. आणखी 830 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 16 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि कंसात आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – सातारा 224 (39409), कराड 160 (26205), खटाव 98 (19000), माण 87 (12883), कोरेगाव 82 (16373), पाटण 59 (8150), जावळी 19 (8398), फलटण 36 27997), वाई 33 (12439),
खंडाळा 17 (11554), महाबळेश्वर 2 (4216) व इतर 13 (1265), असे आजपर्यंत एकूण एक लाख 87 हजार 889 करोनाबाधित आहेत. गेल्या 24 तासांमध्ये मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या आणि कंसात आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची
एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – सातारा 5 (1201), कोरेगाव 3 (379), वाई 2 (329), जावळी 1 (189), कराड 1 (767), खटाव 1 (475), माण 1 (253), पाटण 1 (192), फलटण 1 (279), खंडाळा 0 (147), महाबळेश्वर 0 (44), असे आजपर्यंत एकूण 4255 करोनाबळी आहेत.
जिल्ह्यात 674 जण करोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालये, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेतलेल्या 674 नागरिकांना बुधवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.