चिंताजनक! नव्या करोनाचा आता आशियात शिरकाव

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्यानंतर संपूर्ण जग चिंतेत आहे. अशात करोनाच्या नव्या अवताराची लागण झालेली एक रुग्ण आशिया खंडात आढळून आली आहे. त्यामुळे आशिया खंडातील देशांना आता मोठा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

करोना विषाणूच्या नव्या अवताराची लागण झालेली रुग्ण सिंगापूरमध्ये सापडली आहे. सिंगापूर सरकारनेही या बातमीची पुष्टी केली आहे.

सिंगापूरमध्ये विदेशातून परत आलेल्या प्रवाशांपैकी विलगीकरणात ठेवण्यात आलेले 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे सर्वजण युरोपवरुन सिंगापूरमध्ये आले होते. या प्रवाशांना सिंगापूरमध्ये पोहोचताच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. 

दरम्यान सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने करोना विषाणूच्या B117 विषाणूचा सामुहिक संक्रमणाचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं म्हटलंय. 

सिंगापूरमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार करोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेला रुग्ण 6 डिसेंबरला सिंगापूरमध्ये आला होता. त्याचा कोरोना अहवाल 8 डिसेंबरला पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. पण सुदैवाने त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.