चिंताजनक ! जगभरातील २९ देशांत आढळला करोनाचा ‘लेंबडा व्हेरियंट’; WHOचा दावा

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गासंदर्भात दररोज नवनवीन शोध आणि अभ्यास समोर येत आहेत. जेणेकरून करोनाच्या उत्पत्ती आणि त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करता येतील. त्यातच आता करोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन खुलासा केला आहे.

डब्ल्यूएचओने म्हटलं की, जगभरातील २९ देशांत करोना संसर्गाचा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. या नवीन व्हेरियंटचं नाव लेंम्बडा आहे.  हे व्हेरियंट दक्षिण अमेरिकेत आढळून आलं आहे. येथेच याची उत्पत्ती असल्याचं समजतं. करोनाचं हे नवीन व्हेरियंट पेरूमध्ये आढळून आलं.

पेरू येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं  की, एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत आढळून आलेल्या ८१ टक्के रुग्णांमध्ये लेंबडा व्हेरियंट आढळून आलं आहे. तर चिलीमध्ये ६० दिवसांत आढळून आलेल्या प्रकरणांमध्ये ३२ टक्के रुग्णांमध्ये हेच व्हेरियंट आढळलं आहे. या व्यतिरिक्त अर्जेंटीना आणि इक्वाडोर येथेही हे व्हेरियंट आढळून आलं आहे.

डब्ल्यूएचओने म्हटलं की, लेंबडा व्हेरियंट वंशात उत्परिवर्तीत होतो. या व्हेरियंटने करोनाची संक्रमण शक्ती वाढू शकते. मात्र या संदर्भात सबळ पुरावे मिळाले नाही. त्यामुळे या व्हेरियंटचा अभ्यास होणं गरजेचं आहे.

जगभरात आतापर्यंत करोनाच्या डेल्टा व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. यामुळे लाखो लोकांना प्राण गमवावा लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.