चिंताजनक! लसीकरणानंतर इस्रायलमधील 13 जणांना “फेशीयल पॅरलिसिस”

जेरूसलेम : जगात एकीकडे लसीकरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आता या लसीकरणाचे काही भयंकर दुष्परिणामही समोर येत आहेत. इस्रायलमधील 13 जणांना करोनाची लस घेतल्यानंतर फेशीयल पॅरलिसिस म्हणजेच चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका आल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

इस्रायलमधील आरोग्य विभागाने अशाप्रकारे लसीचे साइड इफेक्‍ट दिसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली असल्याची माहिती इस्रायलच्या एका वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच अनेकजण करोना लसीच्या या साईड इफेक्‍टमधून बाहेर आले असले तरी त्यांना हा त्रास जाणवल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मला जवळजवळ 28 तास फेशियल पॅरलिसिसचा त्रास जाणवत होता, असे एका वृत्तसंस्थेशी बोलताना एका व्यक्तीने सांगितले. मात्र नंतर आपण यामधून बाहेर आल्याचेही या व्यक्तीने स्पष्ट केले आहे.

पॅरालिसिस बरा झाल्यावर आरोग्य मंत्रालयाने नियोजित वेळेनुसार दुसरा डोस देण्याचा आग्रह धरला असला, तरी आता या लोकांना शॉटचा दुसरा डोस देण्यासंदर्भातील भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मला सुरुवातील चेहऱ्यातील स्नायूंच्या हलचालीमध्ये त्रास जाणवला. नंतर सारं काही लगेच ठीकं झालं असं झालं नसलं तरी आता प्रकृती आधीपेक्षा नक्कीच उत्तम आहे, असे करोना लसीचा साइफेक्‍ट दिसून आलेल्या एकाने सांगितले.

इस्रायलमध्ये 20 डिसेंबर 2020 पासून करोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 72 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांना करोनाची लस देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.