सातारा – जिल्ह्यात काल (दि. 26) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, नवे 977 करोनाबाधित आढळले असून, गेल्या 24 तासांत 15 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी रविवारी दिली.
बाधितांच्या आणि करोनाबळींच्या संख्येत थोडी घट झाली असली, तरी जिल्ह्यात संक्रमणाचा धोका कायम आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि कंसात आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे –
कराड 255 (27159), सातारा 217 (40106), कोरेगाव 97 (16656), खटाव 95 (19384), फलटण 91 (28283), पाटण 53 (8371), माण 48 (13107), खंडाळा 38 (11723), जावळी 25 (8490), वाई 25 (12588), महाबळेश्वर 18 (4263) व इतर 15 (1305),
असे आजपर्यंत एकूण एक लाख 91 हजार 435 करोनाबाधित आहेत. गेल्या 24 तासांमध्ये मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या आणि कंसात आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे –
कराड 4 (798), माण 3 (259), सातारा 2 (1224), खटाव 2 (481), कोरेगाव 2 (382), पाटण 1 (195), वाई 1 (331), जावळी 0 (192), खंडाळा 0 (149), महाबळेश्वर 0 (45), फलटण 0 (280), असे आजपर्यंत एकूण 4336 करोनाबळी आहेत.