वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक

वरळी : पूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अखेर मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. त्याला शहापूरमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्याबरोबर आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यानंतर आता मिहीर शाहाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
काय घडले नेमके?
मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्य स्कुटरवरुन जात असताना बीएमडब्यू कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोघंही कारच्या बोनटवर पडले. कार चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेली. प्रदीप नाखवा हे बाजूला फेकले गेले तर कावेरी नाखवा ह्या बोनटवरून खाली पडल्या आणि त्यांच्या साडीचा पदर कारमध्ये अडकल्याने त्या फार पुढे फरफटत गेल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर
वरळी हिट अँड रन प्रकरणात 1,735 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने या प्रकरणी मिहिर शाहचे वडील राजेश शाह यांना जामीन मंजूर केला. 15 हजार रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर राजेश शाह यांना शिवडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तसेच चालक राजऋषी बिडावत याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.





