पिंपरी | लोणावळा भाजपाकडून जागतिक योग दिन उत्साहात

लोणावळा, (प्रतिनिधी) – जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात सूक्ष्म योगा स्कुलचे पंकज शर्मा व हिमांगी वार्षने यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योग असनांचे धडे घेतले.
लोणावळा शहरातील महिला मंडळ हॉल मध्ये पार पडलेल्या या योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भाजप शहराध्यक्ष अरुण लाड यांनी भारताने जगाला दिलेल्या काही अमुल्य भेटींपैकी एक म्हणजे ‘योग’ हे आहे.
जागतिक स्तरावर स्वीकारले गेलेले, भारतीय संस्कृतीचे हे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. निरोगी शरीर आणि प्रसन्न मनासाठी सर्वांनी दैनंदिन योग करून, आपले आरोग्य जपावे असं प्रतिपादन केले.
यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, अर्जुन पाठारे, हर्षल होगले, जयप्रकाश परदेशी, ललित सिसोदिया, राजाभाऊ खळदकर, बाबू संपत, शुभम मानकामे, चंद्रकांत गाडे, रुपेश नंदवटे, श्रावण चिकणे, शुभम दाभाडे, संतोषी तोंडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि लोणावळेकर नागरिक उपस्थित होते.





