जागतिक रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा : मॅग्नस कार्लसनने तिस-यांदा पटकावलं जेतेपद

माॅस्को : नाॅर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने जागतिक रॅपिड बुध्दिबळ स्पर्धेतील खुल्या गटात पुरूषांमध्ये ११.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत त्याचे तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी कार्लसनने २०१४ आणि २०१५ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
Congratulations to the frontrunners of the King Salman Rapid Championship!
🥇Magnus Carlsen – 11,5 points (out of 15 games)
🥈Alireza Firouzja – 10,5
🥉Hikaru Nakamura – 10,5
4⃣ Vladislav Artemiev – 10,5Website: https://t.co/gHBnFGa1e5 #rapidblitz #chess #winner pic.twitter.com/FEGatdkdBQ
— International Chess Federation (@FIDE_chess) December 28, 2019
इराणच्या फिरौजा अलीरेजाने १०.५ गुणांसह रौप्यपदक मिळवले, त्याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पिछाडीवर सोडले क्यामुळे हिकारू नाकामुराला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
याशिवाय स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर सूर्यशेखर गांगुली ९ गुणांसह ४० व्या तर अधिबन नऊ गुणांसह ४५ व्या स्थानावर राहिला.





