World Athletics Championships : भालाफेकीत अन्नु राणीने रचला इतिहास

चॅंगवॉन – भारताची महिला भालाफेकपटू अन्नू राणी हीने जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांच्या भालाफेक क्रीडा प्रकारात अंतिम फेरी गाठताना ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अन्नु राणी सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.
अन्नूने आपल्या अखेरच्या प्रयत्नात 59.60 मीटर भालाफेक केली. पहिला प्रयत्न फाऊल ठरला तर दुसऱ्या प्रयत्नात 55.35 मीटर भाला फेक केली. यावेळी ही सुमार कामगीरी ठरली होती व ती अपात्र ठरण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र, तिसऱ्या व निर्णायक प्रयत्नात यशस्वी होत तीने 59.60 मीटर भाला फेकून आपले आव्हान राखले. पात्रता फेरीतील दोन गटातून सर्वोत्तम आठ भालाफेकपटू अंतिम फेरीत पात्र ठरले.
अन्नूच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद आहे. आता तीला शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत यापूर्वी तीनेच नोंदवलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. तिची 63.82 मीटर ही वैयक्तिक कामगिरी आहे.
अन्नूने या स्पर्धेपूर्वी सलग दोन वेळा अंतिम फेरीत दाखल होण्याची कामगिरी केली असून आता यंदा तिसरी वेळ असून तीच्याकडून पदकाचीच अपेक्षा आहे.





