Ayatollah Ruhollah Khomeini : अमेरिका आणि इस्त्राईल यांनी संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वेाच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा देखील मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत इराणी न्यूज चॅनेलने माहिती दिली आहे. आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हे युद्ध सुरू केले आणि आम्ही संपवणार आहोत. इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये हार स्वीकारण्यासाठी तयार नाही. अशा शब्दांत अमेरिका आणि इस्त्राईलच्या हवाई हल्ल्याला खामेनी यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता थेट इराणच्या सर्वेाच्य नेत्याला ठार करण्यात आले आहे. इवाई हल्ल्यात इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी सैनिकांना हत्यार टाकण्याचे आव्हानही केले होते. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या घरावर आणि कार्यालयावर हवाई हल्ले करण्यात आले. त्यांची मुलगी, जावई, सून, नातू आणि इतर नातेवाईक घरात उपस्थित होते, या सर्वांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणमध्ये अली खामेनी आणि त्यांचे कुटुंब साधेपणा आणि धार्मिक मूल्यांचे प्रतीक म्हणून सादर केले जाते. मात्र या कथित संपत्तीच्या खुलाशांमुळे त्यांच्या प्रतिमेला तडा गेल्याची चर्चा आहे. देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि शासनाविरोधातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिकच संवेदनशील ठरत आहे. आयातुल्ला अली खामेनी यांनी 1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर इराणचे सर्वोच्च नेते पद भूषवले. 1979 च्या इस्लामिक क्रांतीत अमेरिकाप्रणीत शाह मोहम्मद रेझा पहलवी यांची सत्ता संपुष्टात आली होती. सर्वोच्च नेते म्हणून आयातुल्ला अली खामेनी यांच्याकडे सरकार, सैन्य आणि न्यायव्यवस्थेवरील अंतिम अधिकार होते. देशाचे आध्यात्मिक नेतेही मानले जातात. त्यांच्या कार्यकाळात इराणने पाश्चात्त्य देशांशी वाढता तणाव, आर्थिक निर्बंध आणि अंतर्गत आंदोलनांचा सामना केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर इराणची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याविषयी अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. हेही वाचा : Sonal Chauhan : ‘PM सर, आम्हाला इथून काढा’, जन्नतफेम अभिनेत्री दुबईमध्ये अकडली; मदतीची मागणी करत सांगितली धक्कादायक परिस्थिती