Satara | ‘यशोदा`च्या पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थी विकासासाठी कार्यशाळा

सातारा, (प्रतिनिधी)- यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल विभागाने ऑटोमोटिव्ह प्लॅस्टिक प्रॉडक्ट डिझाईन या विषयावर विद्यार्थी विकास कार्यशाळेचे आयोजन केले.
डिझाईनच्या प्रगत संकल्पनांवरील विद्यार्थ्यांची समज वाढवणे आणि त्यांच्या विकासाला चालना देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे महेश शिंदे यांनी डिझाईन सॉफ्टवेअरच्या प्रयोगांबाबत माहिती दिली. त्यांनी विविध ऑटोमोटिव्ह प्लॅस्टिक प्रॉडक्ट डिझाईनचे महत्त्व स्पष्ट केले,
त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिक डिझाईन विकास जीवनचक्राची सखोल माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह घटकांसारख्या वस्तू (डॅशबोर्ड, बंपर किंवा इंटिरियर ट्रिम) डिझाइन करण्याच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होता येईल.
यातून त्यांना प्रत्यक्ष डिझाइन प्रक्रियेचा अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रियेच्या, इंजेक्शन मोल्डिंगच्या मर्यादा समजून त्यानुसार भाग डिझाइन कसे करावे हे शिकता आले.
डीएफएम तत्त्वांवर आधारित डिझाइन तयार करून विद्यार्थ्यांना कमी खर्चात उत्पादनासाठी योग्य प्लॅस्टिक उत्पादने कशी तयार करावीत याची कल्पना आली.
कार्यशाळेतून मिळालेल्या डिझाइन्स किंवा प्रोटोटाइप्स विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये उपयुक्त ठरू शकतात. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
कार्यशाळेचा उद्घाटन कार्यक्रमात यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रवीण गावडे, कॅम्पसच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. रणजित बसुगडे, प्रा. रणजीत खांडेकर आणि इव्हेंट समन्वयक प्रा. एस. जे. पाटील, इतर सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



